Share

भाजप नेत्यांना झालंय तरी काय, म्हणे चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोना जातो !

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिल्यानंतर आता कोरोना टाळण्यासाठी भाजपाच्या आणखी एका खासदाराने एक अजब सल्ला दिला आहे. चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला या खासदारांनी दिला आहे. खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला आहे.

राजस्थानमधील टोंक येथील भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते चिखलात अंघोळ करत शंख वाजवताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये ते असेही म्हणत आहेत की, ‘कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. ही औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढते.’

मोठी बातमी : दिग्गज फलंदाज चेतन चव्हाण यांचे कोरोनामुळे निधन

कोरोना टाळण्यासाठी औषध खाण्याची नक्कीच गरज नाही, असे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी म्हटले आहे. स्वत: सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी चिखलात अंघोळ करून आणि शंख वाजवून आपली प्रतिकारशक्ती वाढवल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर इकडे, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. त्यामुळे आशा वाचाल नेत्यांमुळे भाजपच्या शिरस्थ नेतृत्वाला तोंडावर पाडाव लागत आहे.

मोठी बातमी : अकोल्यात संबित पात्रांच्या विरोधात कॉंग्रेसकडून तक्रार दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!