अकोला : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरुद्ध युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांनी सिटी कोतवाली पोलिसांत भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९८, ३०४ अ आणि ५०५ नुसार तक्रार दाखल केली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही वेळ आधी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात संबित पात्रा यांनी अभद्र भाषेचा वापर करीत राजीव त्यागी यांना अपमानजनक वागणूक दिली होती. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोपही गणगणे यांनी तक्रारीत केला आहे. ही तक्रार ठाणेदार यांनी चौकशीमध्ये ठेवली आहे. यावेळी अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि एका हिंदी वृत्तवाहिनीवरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी हे का वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सामील झाले होते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू तिवारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली असून सांबित पात्रा यांच्या अटकेची मागणी केली आहे.
सेलू कोरोना केअर सेंटरचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवावा
सोशल मीडियावर यावरून उलटसुलट चर्चा असून अनेकांनी सांबित पात्रा यांना अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे. सोशल मीडियावर काही काळ हॅशटॅग #ArrestSambitPatra असा ट्रेंडही होता. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर सांबित पात्रा आणि एका हिंदी वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाविरोधात मोठ्या प्रमाणात भडकलेले दिसून आले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावरूनच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी ओडिशा प्रदेश युवक काँग्रेसनेही तक्रार दाखल केली आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती कायम संस्मरणीय – रामदास आठवले


