Share

मोठी बातमी : दिग्गज फलंदाज चेतन चव्हाण यांचे कोरोनामुळे निधन

Published On: 

नवी दिल्ली : भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चेतन चौहान यांना कोरोना झाला होता. चौहान यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण होती. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखीच बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी दिली.

जुलै महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती कायम संस्मरणीय – रामदास आठवले

चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर नसलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.

मोठी बातमी : अकोल्यात संबित पात्रांच्या विरोधात कॉंग्रेसकडून तक्रार दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!