🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.
तसेच सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी ‘मी पण सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आहेत.
‘सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा आक्रमक पावित्रा कायम राहणार आहे. लवकरात लवकर सरकारने सावकरांबद्दल भूमिका स्पष्ट करावी,’ अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. याच प्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा आक्रमक पावित्रा दिसून येत आहे.
सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे.भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता आहे. भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात आले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206450483860135942?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206444082081353728?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
