🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे सप्टेंबर, 2019 पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ होणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तर कर्जमाफीची घोषणा म्हणजे धूळफेक करणारा निर्णय असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र व भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, सरकार स्थापन करताना आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असल्याच्या घोषणा सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी केल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करू अशी जाहीर वाच्छता करून या लोकांनी लोकप्रियता मिळवली.प्रत्यक्षात मात्र दोन लाखावरच शेतकऱ्यांची बोलवण केली, असल्याची टीका संतोष दानवे यांनी सरकारवर केली आहे.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर, 2019 पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधानसभेत केली. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्च, 2020 पासून लागू होईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र ठाकरे सरकार मधाचं बोट लावून शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1208659431786860544?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1208659032937918465?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

