मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेत्री कंगणा यांच्यातील राजकीय वादात कंगणा रणौतच्या कार्यालयात हतोडा चालवला गेला असून हि कारवाई मुंबई महानगरपालिका (बीएमसी) द्वारे करण्यात आली होती. अभिनेत्री कंगनाच्या अवैध बांधकामप्रकरणी मुंबई महापालिका आणि कंगनामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे.
अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला होता. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यांनतर याची कारवाई मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे.
कंगणा प्रकरणात पालिकेने न्यायालयात नेमलेल्या वकिलाला आतापर्यंत किती मानधन देण्यात आले, याची माहिती शरद यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
यावरूनच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी राज्यसरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका टीका केली आहे. ‘मुंबईकर कर हे पेंग्विन आणि कंगना राणावतच्या केसमधील वाकीलासाठी देतात आता यांच्या मुलांचे लग्न देखील आपल्याच पैशातून होतील’ अस ट्विट करत नितेश राणेंनी घणाघात केला आहे.
Wow! Mumbaikers pay tax for..
1.)Penguins
2.)lawyers for Kanganas caseWhat else is left???
Inke baccho ki shaadi abhi humare hi paiso se hogi lagta hai!!
— Nitesh Rane (@NiteshNRane) October 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे’
- अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक
- देशी गर्ल चा विदेशी चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ लवकरच
- भाजपाला नितीशकुमार हे पुन्हा धोका देतील; चिराग पासवान यांनी केले भाकीत
- शेतकऱ्यालाही वर्क फ्रॉम होम करता यावे यासाठी संशोधन करा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

