सांगली : भाजपचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या गाडीचे वाहक गणेश भुते यांनी त्यांचे वाहन शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सध्या आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजू जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.
याबाबत विचारणा केली असता, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली, तसेच आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलेले राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून आमदार पडळकर यांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह गणेश भुते या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

