Share

राष्ट्रीय कृषी परिषद की डान्सबार…?; भाजपा आमदार अनिल बोंडे यांचा प्रताप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. अशावेळी दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मदतीसाठी सरकारकडे अपेक्षेने बघतो असतो. मात्र राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने शेतकऱ्याला मदतीच्या नावाखाली भरवलेल्या कृषी विकास परिषदेत चक्क नाच-गाण्यांचा कार्यक्रम घेतला. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे हा प्रकार घडला.

कृषी विकास परिषदेच्या नावाखाली भाजपाने अश्लील नाचांचाच कार्यक्रम घेतला असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेतील मंचावर अर्धे-मुर्धेच कपडे परिधान करून आलेली एक तरुणी आणि तिच्यासोबत नाचणारा एक माणूस असा व्हीडियो व्हायरल झाला आहे.

नाचणारा हा माणूस म्हणजे चक्क वरुडचे माजी नायब तहसीलदार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना दुष्काळासबंधी मार्गदर्शन राहिलं बाजूला, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्याचं मार्गदर्शनही राहिलं बाजूला. शेरो-शायरी आणि अश्लील नाचामुळेच ही परिषद गाजली.

एकीकडे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत असतानाच भाजपाचे नेते मात्र असे नाच-गाण्याचे कार्यक्रम भरवून शेतकऱ्यांना कशी मदत करतायत, हे कोडंच आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!