Share

भाजप आ. अमित साटम यांची महापौर पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मालाड येथील क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद उद्भवला आहे. भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप आमदार अमित साटम यांनी टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल झालं आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम (BJP Ameet Bhaskar Satam) यांनी पोलिसांना पत्र पाठवून महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

भाजप आ. साटम यांनी जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांना तक्रार अर्ज दिला आहे. साटम या तक्रार अर्जात म्हणतात, “मी आपले लक्ष मुंबई महानगरपालिकेचे चिटणीस कार्यालय व मुंबईच्या महापौरांकडून केलेल्या फोर्जरी (कागदपत्रांची छेडछाड) कडे वेधू इच्छितो. काल एक कागद मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर व महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलम शेख यांच्या तर्फे व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभेमध्ये एम/पूर्व विभगातील एका रस्त्याला शहीद टिपू सुल्तान मार्ग असे देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिलेले आहे.”

“मी असे नमूद करू इच्छितो की सदर कागदामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सदस्यांची नावे ही लिहिलेली आहेत. परंतु असा कोणताही फोर्मेट हा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नाही व हे फिरवण्यात आलेले पत्र नव्याने तयार केलेले आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभेचा ओरिजिनल प्रस्ताव मी आपणाकडे या पत्रासोबत जोडीत आहे. यामध्ये अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करून माझे नाव अ.भा.साटम असे हाताने लिहिलेले दिसून येते.”

“या पत्रावर खाली सही व मंजूर असे लिहिलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ हा होतो की सदर प्रस्तावावर खडाखोड करून माझे नाव लिहिलेले आहे व काल फिरवलेले पत्र हे पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे मी आपणास अशी विनंती करतो की मुंबई शहराच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलम शेख व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे चिटणीस यांच्या विरुद्ध ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत फोर्जरी (कागदपत्रांची छेडछाड), खाडाखोड, दिशाभूल व मानहानीचा गुन्हा आपण दाखल करावा व आपण केलेल्या कारवाईचा तपशील लेखी स्वरूपात मला कळवावा अशी आपणास विनंती.” असे साटम यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!