टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी मतदारसंघ प्रचार, सभांनी ढवळून टाकले आहे. तसेच महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे बोलत होती. मुंडे म्हणाल्या की, मतदान यंत्रावर माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दुसरा आहे, कारण ते दोन नंबरवाले आहेत, असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, परळी मतदारसंघात मतदानयंत्रावर माझा तिसरा नंबर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. म्हणून माझा नंबर तिसरा आहे, असे मुंडे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांचा मतदान यंत्रावर पहिला नंबर येतो. कारण ते आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत. कोणीही त्यांच्यासमोर आलं, तरी त्यांना जयदत्त अण्णांच्याच पाया पडावं लागेल, असे मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182502165899698176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182315280678047745?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

