🕒 1 min read
मुंबई : नुकत्याच हैद्राबाद महानगरपालिकेची निवडणुक पार पडली. या निवडणुकांसाठी भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते केंद्रीय मंत्री अमित शहा अशी बलाढ्य फौजच भाजपने मैदानात उतरवली होती. याचा भाजपला मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, राज्यात देखील आता स्थानिक निवडणुकांची चाहूल लागली आहे. येत्या दीड वर्षांमध्ये अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणूक होणार आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद या शहरांच्या निवडणूक तर अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक व आमदार निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र लढत भाजपला मोठा धक्का दिला होता. मात्र, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावरचं लढतील असं चिन्ह सद्या आहे.
मुंबई, पुण्यातील महापालिकांच्या निवडणुकांना सुमारे सव्वा वर्षांचा कालावधी आहे. दरम्यान, भाजपने हैद्राबाद महापालिका निवडणुकीत दिल्लीसह अन्य बडे नेते प्रचाराच्या रिंगणात उतरावल्यावरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भाजप आक्रमक असेल असं दिसून येत आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. ‘भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फक्त महापालिका निवडणूकच कशाला आमच्याकडे चाळ कमिटीच्या निवडणुका लागणार आहेत , त्यातही त्यांनी उतरावं,’ अशी मिश्किल टीका त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी काय पुण्यातच असतो; अजित पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘अजितदादा, आपण जनतेसाठी जे काम करायचं ते करायचंच’
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- मुख्यमंत्री महोदय, सरकार इतके निर्दयी कसे काय झाले ? नववर्षानिमित्त पोस्टरमधून मनसेचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
