Share

राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपची राज्यपालांकडे तक्रार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष  मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या शिष्ट मंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे तातडीने उघडण्याची मागणी केली. बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली असावीत असा आग्रह या शिष्टमंडळाने धरला. भाजपच्या या मागणीवर राज्यपाल महोदयांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप मुंबई अध्यक्ष  मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली माननीय राज्यपाल महोदयांना भेटण्यास गेलेल्या भाजप आमदारांच्या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विजय भाई गिरकर, योगेश सागर, कालिदास कोळंबकर, सुनील राणे, श्रीमती मानिषाताई चौधरी, राहुल नार्वेकर,  मिहीर कोटेचा,  पराग शाह यांचा समावेश होता.

यावेळी  प्रवीण दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दलही राज्यपालांकडे तक्रार केली. ई-पास बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले. याहीबाबत राज्यपालांनी मुख्य सचिवांनी स्वतःच्या पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने  राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

शंभर किलो पुस्तकांच्या ग्रंथतुलेतून ‘रिपाइं’तर्फे अण्णाभाऊंना अभिवादन

युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर! अभिषेक सराफ महाराष्ट्रात पहिला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!