🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे राहुल गांधींवर टीका केली आहे. ते पिंपरी चिंचवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘राहुल गांधी हे हायब्रीड व्हर्जन आहेत. इंडो-इटलियन व्हर्जन असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीच माहिती नाही, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मला वाटते याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूण कोअर कमिटी व केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेतलेली आहे. आता सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय होईल, असे पक्षांतर्गत नाराजीबाबत विचारले असता शिंदे सांगितले.
दरम्यान, याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी जे काही बोलले आहेत ते अत्यंत लाजिरवाणे आहे. या देशामध्ये सावरकरांनी केवळ कारावास भोगला नाही तर क्रांतिकारांना प्रेरणाही दिली. राहुल गांधीना सावरकरांच्या नखाचीही सर नाही. अशा शब्दांत स्वातंत्रवीर सावरकारांविरोधात बोलणाऱ्या राहुल यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206428306888773637?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206429318361960448?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
