🕒 1 min read
मुंबई : कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मंदिराच्या सोन्याची काळजी करु नये असा, सल्ला भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात नक्कीच सुवर्णयुग येणार आहे. बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये, असेही विखे पाटील म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट करत, “सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे”, असं सांगितले होते. यावर भाजप नेत्यांनी चव्हाणांना लक्ष्य केले.
विखे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मंदिराच्या सोन्याची काळजी करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नक्कीच सुवर्णयुग येणार आहे. बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नये. तसेच यावर माजी खा . किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली आहे की, देशातील सोनं सरकारने ताब्यात घ्यावे. मला त्यांना एक विचारायचे आहे की, त्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी ही मागणी करण्यास सांगितले आहे का? हे काँग्रेसचे मत आहे का? ही मागणी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची आहे का?”, असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.
Prithviraj Chavan has asked Government of India must take over gold of All Mandirs. Will he clarify Whether Sonia Gandhi ji, Congress, Congress ruled State Governments/Chief Ministers have supported his demand?? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/NVETUh7bI0
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 14, 2020
दरम्यान देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे जवळपास 76 लाख कोटी रुपयांचं सोनं आहे. हे सोनं केंद्र सरकारने 1 किंवा 2 टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं”, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला दिला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांचा हा सल्ला उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काय म्हणता ! अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार….
‘आता लोकं सेल्फीसाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत’ – अभिनेते परेश रावल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
