टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाकडून निधी मिळविण्यात माहीर असल्याने आमदार कर्डिले यांचे तिकीट कापण्याचा प्रश्नच येत नाही. उलट यावेळी त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे.राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ब्राम्हणी व इतर चार गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ब्राह्मणी व इतर चार गाव पाणीपुरवठा योजनेसाठी आ.कर्डिले यांनी रात्रंदिवस पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली. जिल्ह्यात अनेक अपूर्ण असलेल्या योजनांसाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आल्या. मुख्यमंत्री पेयजल योजनेमुळे अनेक ठिकाणी कामे करता आली. आ. कर्डिले यांनी राहुरी मतदार संघात राज्य शासनाकडून मुख्यमंत्री पेयजल मधून 52 कोटींचा निधी मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे लोणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांच्यावर कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले खा. सुजय विखे यांच्या विरोधात जात आपले जावाई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांची मदत केल्याचा आरोप होता. त्यामुळे नगर जिल्हा भाजप विखेमय झाल्याने कर्डिलेंचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलल जात आहे. मात्र, आता लोणीकर यांनी आश्वस्त केल्यानंतर कर्डिले यांच्यावर असलेली टांगती तलवार काही वेळ तरी बाजूला सरली आहे असच म्हणावं लागेल.
कलम ३७० हटवणे घटनाबाह्य नाही, रशियन सरकारचाही भारताला पाठींबा
सरकारला उशिरा सुचले शहाणपण; आता पूरग्रस्तांना रोख रक्कमेत दिली जाणार मदत


