🕒 1 min read
रत्नागिरी: शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य मध्यप्रदेशात अभ्यास दौऱ्या साठी गेले आहेत. मात्र यावर भाजप नेते नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी संताप व्यक्त केला आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद दिवाळखोरीच्या मार्गावर असूनही या दौऱ्यासाठी १० लाख रुपये खर्च केले असल्याचेही नीलेश राणे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांवर टीका करताना नीलेश राणे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा परिषद तोट्यामध्ये आहे, तिला फायद्यात आणण्यासाठी कुठल्याही योजना किंवा उपक्रम राबवले जात नाहीत. जिल्हा परिषदेचा निधी हा शिवसेनेच्या सदस्यांना पोसण्यासाठी आहे का, असा प्रश्न नीलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. जनतेचे पैसे स्वतःच्या दौऱ्यासाठी वापरुन हे सदस्य बिनधास्त फोटोसेशन करत असल्याची टीका देखील नीलेश राणे यांनी केली आहे.
भारतरत्न किंवा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे आणि तो घेण्यासाठी आपण दिल्लीला चाललो आहोत, अशा थाटात शिवसेनेचे सदस्य विमानतळावर वावरत होते. कोणी टी-शर्ट काय घालतंय, हाफ पँट काय घालतंय, तुम्ही अभ्यास दौऱ्यासाठी जात आहात की सहलीला, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
- केएल राहुल एकदिवसीय आणि टी-२० चा उपकर्णधार असणार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
- भारतमातेने आपला सुपुत्र आणि असामान्य योद्धा गमावला आहे- चंद्रकांत पाटील
- …पण केंद्र सरकार सीमावादावर संसदेत चर्चा करण्यास तयार नाही; सोनिया गांधींचा आरोप
- लोकांच्या मनातील शंकाचे निरसण करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची- संजय राऊत
- T20 नंतर आता एकदिवशीय कर्णधारपदही हिटमॅनच्या हाती; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
