Share

भारतमातेने आपला सुपुत्र आणि असामान्य योद्धा गमावला आहे- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई: काल (८ डिसेंबर)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat)यांच्यासह १२ जण शहीद झाल्याची माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP state president Chandrakant Patil) यांनीही ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कुन्नुर येथे झालेल्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचे निधन झाल्याची दुःखद माहिती कानी पडली. त्यांचे निधन हे देशासाठी फार मोठे नुकसान आहे. आज भारतमातेने आपला सुपुत्र आणि असामान्य योद्धा गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती! असे ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल हे होते.या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. या महाविद्यालयात बिपीन रावत यांच लेक्चर होतं. या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!