🕒 1 min read
मुंबई : काल (८ डिसेंबर)तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते. त्यात भारताचे सीडीएस बिपिन रावत हे सुद्धा होते. भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत(CDS General Bipin Rawat)यांच्यासह १२ जण शहीद झाल्याची माहिती दिली आहे. यावरच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’रशियन बनावटचे अत्याधुनिक ते हेलिकॉप्टर होते. बिपिन रावत यांच्यावर देशाने सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या त्या संदर्भात ते काम करत होते. चीन आणि पाकिस्तान संदर्भात केलेल्या कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. बिपिन रावत यांचा अत्यंत सुरक्षित वाहनातून जाताना अपघात झाला होता. त्यामुळे देशाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. सरकार त्या संदर्भात चौकशी करेलच. पण लोकांच्या मनातील शंकाचे निरसण करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची आहे.’तसेच बिपिन रावत यांच्या जाण्याने सरकार सुद्धा गोंधळलेले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये बिपिन रावत हे त्यांचा लष्करी रुबाब बाजूला ठेवून आमच्यासोबत संवाद साधत असत. मला खात्री आहे की काल देशाचे सर्वोच्च नेतृत्व सुद्धा गोंधळे असेल. या घटनेमुळे त्यांच्या मनात सुद्धा काही शंका निर्माण झाल्या असतील,असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’बिपिन रावत यांना मी फार जवळून पाहिले आहे. आमच्या समितीसमोर माहिती देण्यासाठी आल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. सीमेवरच्या सामान्य सैनिकापर्यंत त्यांचा संवाद होता. अनेकदा त्यांनी अत्यंत किचकट विषय संरक्षण समितीसमोर अगदी सोप्या शब्दात समजून सांगितले. त्यामुळे गोंधळ आणि शंका दूर झाल्या. सर्व शंकाचे बिपिन रावत यांनी अनेकदा सोप्या शब्दात निरसन करण्याचे काम केले.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- …त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
