मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मला धमकावलं जात आहे पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे जे खंदे समर्थक आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘हिंमत असेल तर समोर येऊन लढावं. बायका-पोरांच्याअडून आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आम्ही समोरासमोर लढणारे आहोत. हे सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा निर्वाणीचा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला 'नागडं' कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ' मै नंगा हू'. एका नोटीसला इतका घाबरला संज्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020
दरम्यान, संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवर भाजपने निशाणा साधला आहे. माजी खासदार निलेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले,संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या असं म्हणत राऊत यांच्यावर हल्लाबोल राणे यांनी केला आहे.
तर दुसऱ्या बाजूला भाजपनेते आ.आशिष शेलार यांनी देखील राऊत यांना जुन्या गोष्टींची आठवण करून देत खडेबोल सुनावले आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्राचेच आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या परिवाराचाच एक भाग मानतो. म्हणून आमच्याही मनात त्यांच्याविषयी सहृदयता आहे. पण अशा दमबाजीने काय साध्य होणार, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
कोणाच्या बायका – मुलांना नोटीस मिळाली तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगना राणावत चे घर बुलडोझर लावून पाडणे मर्दपणा होता का ? कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ? असे प्रतिप्रश्न देखील आ. आशिष शेलार यांनी उपस्थित केले.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


