नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेबाबत (Agnipath scheme) तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या योजनेविरोधात देशभरात हिंसक निदर्शने झाल्यानंतर राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी यावर वादग्रस्त विधान केले आहे. मलाही भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक (रक्षक) ठेवावा लागल्यास मी अग्निवीरांना प्राधान्य देईन, असे ते म्हणाले.
अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाते. आमच्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी ट्विट करून म्हटले की, “देशातील जवान आणि लष्कराच्या जवानांचा इतका अपमान करू नका. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात, कारण त्यांना सैन्यात जाऊन आयुष्यभर देशसेवा करायची असते, भाजप कार्यालयाबाहेर पहारेकरी व्हायचे असते म्हणून नाही.”
महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) देखील यावर टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांचा व्हीडीओ ट्वीट करत भाजपला अग्निपथमार्फत देशासाठी सैनिक घडवायचे आहेत की भाजप कार्यालयांसाठी सिक्योरिटी गार्ड!, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

