Share

भाजप नेत्याला ‘पप्पूची पप्पी’ म्हणणे पडले महागात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा देशात सर्वत्र लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारसभांमध्ये विरोधकांवर टीका करताना बऱ्याच नेत्यांची जीभ घसरत असल्याची पाहायला मिळत आहे. असचं वादग्रस्त विधान केल्याने भाजप नेत्याला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना ‘पप्पूची पप्पी’ असं म्हटलं होतं. प्रचारादरम्यान नेत्यांनी त्यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर खासगी जीवनाबाबत टीका टीप्पणी करण्यास निवडणूक आचार संहितेद्वारे मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे असं म्हणण्यामागे कारण काय होतं याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने शर्मा यांच्याकडून मागवलं आहे. शर्मा यांना उत्तर देण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी वादग्रस्त विधानाप्रकारणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, साध्वी प्रज्ञा सिंग, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!