Share

महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का, भाजपचा कांग्रेसवर पलटवार

Published On: 

मुंबई : राज्यात एकीकडे करोनाने हाहाकार माजवला आहे. अशात दुसरीकडे राजकीय वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघत आहे. कारण भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपाने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडे राजकारण सुरुच ठेवले आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असे विचारले जाते. माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने देशाला नवे राजकीय समीकरण दिले असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.

प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात निघालेल्या तरुणाने बाहेर पडताना सांगितलं होतं ‘हे’ कारण

यावर आता भाजप नेते हर्षवर्धन पाटिल यांनी पलटवार केला आहे. ‘यशोमती ठाकूर भाजपचे नेते संपर्कात असल्याचे सांगतात. मात्र, सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणी विचारात तरी घेत का’, असा सवाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. हे काम करण्याऐवजी नको ते मुद्दे उकरुन काढले जात आहेत. प्रशासन कुठे आहे तेच दिसत नसल्याची टीकाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

सोलापुरात हजारो श्रमिकांनी लॉकडाउनच्या विरुद्ध दाखवले निषेधाचे फलक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!