उस्मानाबाद- प्रेमात बुडालेले तरुण प्रेमसाठी काय करतील याचा नेम नाही. अगदी सातासमुद्रापार जाण्याची वेळ आली तर तेही करण्याची तयारी प्रेमवीरांमध्ये असते. उस्मानाबादमध्येही काहीसा असाच प्रकार घडला आहे. सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे.
तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेमीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
झिशानच्या वडिलांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, झिशान 11 तारखेला दहा वाजता घरातून बाहेर पडला. मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. एक तास होऊनही तो घरी आला नाही त्यावेळी त्याला फोन केला. तर त्याचा फोन बंद आला, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, आम्ही वाट पाहिली पण तो घरी आला नाही. तीन महीने झालं लॉकडाऊनमध्ये तो कधीच बाहेर पडला नाही. आम्ही त्याला बाहेर जा म्हटलं तर तो म्हणायचा, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर काय पोलिसांचा मार खायला जाऊ काय. तो नमाज वगेरे घरातूनच करायचा. मात्र त्या दिवशी तो घराच्या बाहेर पडला. दिवसभर तो घरी न आल्यानं आम्ही सात वाजता पोलिस स्थानकात मिसिंगची तक्रार केली.
तो तेरणा कॉलेजला तिसऱ्या वर्षाला इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. मुलगा असा जाईल असं आम्हाला कधीच वाटत नव्हतं. गल्लीत कुणालाही असं वाटलं नव्हतं. आता हे समोर आल्यावर सगळेजण आश्चर्याने विचारताहेत की, तो असं करुच शकत नाहीत. तो घरात लॅपटॉपवर अभ्यास करायचा, आम्हाला याबाबत माहिती नसल्यानं तो नेमकं काय करतोय? हे कसं कळणार, असंही झिशानच्या वडिलांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
‘सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना कडकडून मिठी मारेन’
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
शिवसेना खासदार पुत्राची पोलिसांशी हुज्जत, निलेश राणेंनी समोर आणला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

