सोलापूर – सोलापूर शहरामध्ये कालपासून 10 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे, मात्र कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी पर्याय असू शकतं नाही अशी भूमिका सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे.
तब्बल 10 दिवस हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगारांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातं आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आज तब्बल 10 हजार कुटुंबांनी लॉकडाऊनच काटेकोर पालन करत लॉकडाउनच्या विरोधात निषेध फलक झळकावून आंदोलन केलं आहे.
सध्या सुरु असलेलं लॉक डाऊन लवकरात लवकर हातावर अन्यथा येत्या 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा जेष्ठ मार्क्सवादी नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.
दरम्यान या दहा दिवसात सोलापुरातील कारखानदारांनी विडी कामगार,यंत्रमाग कामगारांना किमान 2 हजार आणि राज्य सरकारने 10 हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना कडकडून मिठी मारेन’
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
शिवसेना खासदार पुत्राची पोलिसांशी हुज्जत, निलेश राणेंनी समोर आणला व्हिडीओ
मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

