Share

‘पक्षाबाबत निर्णय घेण्याची वेळ आलीये, आता नाही पण कोरोनानंतर राजकीय निर्णय घेणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काहीसे नाराज झाले आहेत. याबाबत एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. तर कोरोनाच्या संकटानंतर राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधान परिषदेसाठी माझे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आले आहे असे मला सांगण्यात आले होते. मात्र पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर माझं नाव या यादीत नसल्याचे समजले. यानंतर भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते आणि नेत्यांचे मला फोन येत आहेत.

भाजपामध्ये राहण्याबाबत काहीतरी निर्णय घ्या, असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. वारंवार अन्याय होत आहे, वारंवार तुम्हाला बाजूला सारलं जातंय. त्यामुळे याचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असा अनेक कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही, पण कोरोनाच्या संकटानंतर आपण राजकीय निर्णय घेणार आहे, असे खडसे म्हणाले.

यावेळी खडसेंनी मला इतर पक्षातून ऑफर येत असल्याचंही सांगितलं. मात्र मी नेहमी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, असे खडसे म्हणाले. मी चाळीस-बेचाळीस वर्षे भाजपामध्ये काम करत आहे. यावेळी विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही, असेही खडसे शेवटी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘स्थलांतरित कामगारांचा प्रवास ‘एसटी’ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत’

मजुरांना रेल्वेचे तिकीट मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार, CM ठाकरेंचा मोठा निर्णय…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!