Share

मजुरांना रेल्वेचे तिकीट मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार, CM ठाकरेंचा मोठा निर्णय…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यात हाताला रोजगार नसल्याने या मजुरांची आर्थिक बाजू पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळ या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठीही पैसे नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचा प्रश्न सुटला असून हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचा प्रश्न सुटला असून हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आहे. त्यात असे म्हंटले आहे की, परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे मजुरांचा कामधंदा गेल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची भ्रांत झाली आहे. अशातच अनेक मजुरांनी पायीच आपल्या घराची वाट धरली आहे. त्यांच्याकडे प्रावस भाड्याचे पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार, ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनामुळे अभिनेत्री आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे

ग्रेट ब्रिटनने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला, PM जॉन्सन दिली स्टे अलर्टची सूचना !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!