Share

‘स्थलांतरित कामगारांचा प्रवास ‘एसटी’ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने आदेश द्यावेत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विनामुल्य एसटी सेवा सुरु करण्याबाबत विंनती केली आहे. जेणेकरून वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेले मजुरांना, विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाता येईल, यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करून आदेश द्यावेत, असे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी एका व्हिडीओद्वारे केली आहे. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊन्ट वरून प्रसिद्ध केला आहे. त्यात ते म्हणाले की, लांतरित कामगारांचा राज्यांतर्गत प्रवास ‘एसटी’ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ आदेश द्यावेत. तसेच विविध शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊ इच्छितात.त्यांनाही मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी,ही माझी राज्य सरकारला विनंती आहे.

दरम्यान राज्यच्या अनेक एसटी बस आगारातून स्थलांतरीत माजुरांकासाठी आणि नागरिकांसाठी बस सोडण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासन दखल घेत आहे. प्रत्येक बसचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण केले जात आहे. मगच या बसमधून प्रवाश्यांना सोडले जात आहे.

लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेल्या कामगार व मजूरांना सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी आणि संपूर्ण तालुका महसूल प्रशासनाने विशेष नियोजन करून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात रवाना केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा आणि उप विभागीय स्तरावर उत्कृष्ट नियोजन करण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्यात अडकलेल्या ३१२ प्रवाशांना ११ एसटी बसच्या सहाय्याने त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले. काल उशिरापर्यंत नागरिक रवाना करण्यात येत होते. शेवटची बस रात्री 11 वाजता मार्गस्थ करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनामुळे अभिनेत्री आर्थिक अडचणीत, घर चालवायलाही नाहीत पैसे

ग्रेट ब्रिटनने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला, PM जॉन्सन दिली स्टे अलर्टची सूचना !

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!