मुंबई : विधान परिषदेवर संधी दिल्याने भाजपमधील ज्येष्ठ नेते हे चांगलेच नाराज झाले आहेत. तर पक्षानेच आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप एकनाथ खडसे हे वारंवार करत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
एकनाथ खडसे यांना पक्षानं काय दिलं नाही? ७ वेळा आमदारकी, दोनदा मंत्रिपद आणि सूनेला खासदारकी दिली. त्यामुळे त्यांना आणखी किती द्यायचं? कितीही दिलं तरी ते पक्षाच्याविरोधात बोलतातच. असा विचार करूनच केंद्रीय नेतृत्वाने नाथाभाऊंना तिकीट नाकारलं असावं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
खडसेंनी पक्ष वाढवला हे मान्य. पण त्यांना सातवेळा आमदारकी दिली. दोनदा मंत्रिपद दिलं. त्यांच्या मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमनपद दिलं. त्यांच्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं. त्यांच्या सूनेला खासदारकी दिली, पुन्हा मुलीला विधानसभेचं तिकीट दिलं, त्यांच्या पत्नीला महानंदाचं चेअरमनपद दिलं. त्यामुळे नाथाभाऊंना आणखी किती द्यायचं असा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला असेल, त्यामुळेच त्यांना संधी दिली नसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकुळे, पंकजा मुंडे यांची वर्णी लागेल असे म्हंटले जात होते. मात्र भाजपने ज्येष्ठांना घरी बसवून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपने गोपीचंद पडळकर, रणजितसिंग मोहिते पाटील, प्रवीण दटके, अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. यावरून एकनाथ खडसे आपली नाराजी बोलून दाखवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
केवळ रोजगार वाचविणारे नाही, तर वाढविणारे पॅकेज : देवेंद्र फडणवीस
पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहखात्याने उचलेले पाऊल, अनेक उपाय योजनांची केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

