इम्फाळ : एका बाजूला देशात कोरोनाचे संकट आहे तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस आणि भाजप राजकारण करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश असून सहा आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच राष्ट्रीय जन पक्षाचे चार, तृणमूल काँग्रेस एक आणि एका अपक्षाने पाठिंबा काढला असून या सर्वांनी आता काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Manipur: S Subhashchandra Singh, TT Haokip & Samuel Jendai resign as BJP MLAs&join Congress. NPP's Y Joykumar Singh, N. Kayisii, L Jayanta Kumar Singh & Letpao Haokip, resign from ministerial posts. TMC's T Robindro Singh&Independent MLA Shahabuddin withdraw their support to BJP.
— ANI (@ANI) June 17, 2020
एस. सुभाषचंद्र सिंह, टीटी होकीप, सॅम्युअल जेंडई या भाजप आमदारांनी राजीनामा दिला आहे, तर तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि अपक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पाया पडणाऱ्यांनी माझ्यावर टीका करू नये, थोरातांच जोरदार प्रत्युत्तर
मणिपूरमधील काँग्रेस विधिमंडळपक्षाचे नेते ओ. इबोबी सिंग यांनी राज्यात आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजीनामा दिलेले भाजपचे तीन आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे राज्यातील भाजप सरकार संकटात आले आहे.
मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहोत. याबाबत विधानसभा अध्यक्ष यूमनाम खेमचंद सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे, असेही सिंह यांनी सांगितले यामुळे भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
कैरी खरेदी करण्यासाठी लोकांनी उडवला सोशल डिस्टन्सिंगिंचा फज्जा
उपमुख्यमंत्री वाय जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि डोंगरी भाग विकास मंत्री एन. काईशी, खेळ मंत्री लेटपाओ होकीप आणि कुटुंब कल्याण मंत्री जयंत कुमार सिंह यांनी राजीनामे दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

