Share

मुख्यमंत्र्यांच्या पाया पडणाऱ्यांनी माझ्यावर टीका करू नये, थोरातांच जोरदार प्रत्युत्तर

Published On: 

अहमदनगर : विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवर भेट घेतली. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चक्क आठवडा उलटून गेला आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.

“विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नाही” असं थोरातांनी सांगितलं.

दरम्यान, महाआघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाले आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांना तेथे कोणीच विचारीत नाही. सत्तेसाठी कॉंग्रसचे एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. थोडाफार स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी सत्ता सोडून बाहेर पडावे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली.

मी शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणारच – उद्धव ठाकरे

यावर आता बाळासाहेब थोरात यांनी विखेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाच वर्षे विरोधी पक्षनेते असताना त्यांचे वागणे कसे होते, हे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी माझ्यावर केलेली टीका सर्वार्थाने त्यांच्यासाठीच योग्य आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. मग तुम्हीच समजून घ्या, त्यांनी केलेली टीका कोणाला लागू होते,“ असा टोला थोरात यांनी लगावला. आज माध्यमाशी बोलताना थोरात यांनी विखे पाटील यांच्या टीकेला अत्यंत खरमरीत शब्दांत उत्तर दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!