Share

भाजप सरकार,गॅसदरवाढ कमी करा! कमी करा! राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

Published On: 

पुणे: आज महात्मा फुले मंडई येथे गॅसवाढविरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई ,इंधनवाढ,गॅसवाढ यामुळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे. आजपर्यंत कर्जबाजारीमुळे आत्महत्या होत होत्या पण इथुन पुढे महागाई मुळे होतील. असे आंदोलनादरम्यान सांगण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य जनता हैराण झाली असतानाच असताना आता सिलेंडरच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरचा दर 2 रुपये 34 पैसे, तर अनुदानित सिलेंडरचा दर 48 रुपयांनी वधारला आहे. देशातील 81 टक्के कुटुंबं सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे.

सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत 491.31 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत 493.55 रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात 496.65 रुपये, चेन्नईत 481.84 रुपये मोजावे लागतील. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरसाठी 48.50 रुपये अधिक द्यावे लागतील. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडर 671.50 रुपयांना मिळेल. तर विनाअनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत 698.50 रुपये, कोलकात्यात 723.50 रुपये, चेन्नईत 712.50 रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!