Share

कर्नाटक निकालावरून पंतप्रधान मोदींनंतर फडणवीसांनीही साधला शिवसेनेवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टोला लगावला आहे.

आज कर्नाटक मधील पोटनिवडणुकांचा निकाल लागला. यात भाजपचा दमदार विजय झाला आहे. 15 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. कर्नाटकच्या विजयाची संधी साधत मोदींनी आणि फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले की, ‘जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण आज कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहे.

दरम्यान या निकालावरूनचं पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला टोला लाग्वाला. ‘कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे की, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात,’ असं म्हणत मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1204016969130754049?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204016300130914304?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204012529304780803?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!