Share

मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पनवेलमधील भाजपचा फरार नगरसेवक विजय चिपळेकरला अटक करण्यात आली आहे. मुंबई युनिट ३च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विजय चिपळेकरसह प्रशांत म्हात्रेला शेडुंग टोल नाका पनवेल येथून अटक केली आहे.

चिपळेकर यांच्यासह त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी २९ एप्रिलला मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी कामोठे पोलीस स्थानक इथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!