Share

नागपूरमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: शहरातील संघ मुख्यालयाच्या परिसरात भाजप- काँग्रेस आमनेसामने येत त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्याचा मोर्चा रोखल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे निदर्शनात आले आहे. यावेळी दोन्ही पक्षाकडून घोषणा करण्यात आल्या. यावेळी दोन्ही पक्षात वाद वाढून धक्काबुक्कीस सुरुवात झाली त्यामुळे पोलिसांना या वादात मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई आणि केंद्र सरकारविरोधी मुद्द्यांवर रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असून, सुरक्षेच्या कारणामुळे तिथे वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठीकाणाहूनच रॅली काढली. यामुळे तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले.

दरम्यान पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करत वाद मिटवला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी माघार घेत हा वाद शमवला.यावेळी काहीकाळ याठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी येथील गोंधळ मिटविला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!