Share

सत्तारांच्या विरोधात भाजप,कॉंग्रेस,राष्ट्रवादी एकवटले

Published On: 

🕒 1 min read

सिल्लोड:- साऱ्या राज्याचे लक्ष असलेल्या सिल्लोड मतदारसंघात राजकीय कुरघोडीचे प्रकार वाढीस लागले आहेत. कॉंग्रेसची बंडखोरीनंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यात गावा-गावात मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करीत आहे. शुन्य असलेली शिवसेनेची ताकत सत्तारमूळे वाढेल. सत्तारला रोखण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी,बरोबर भाजपचे सर्वजण एक झाले आहेत. सिद्धेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून हे सर्वजन एक झाले.

तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तारांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मोदी लाटेतही चांगली लिड घेत २०१४ मध्ये सत्तार निवडुन आले. मात्र २०१९ लोकसभा निवडणुकी दरम्यान सत्तारांनी सुचवलेल्या उमेदवारास कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यामूळ पक्षा विरोधात बंडखोरी केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने सत्तारांना बडतर्फ केले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही सत्तारांनी त्यांचा उमेदवार उभा केला होता. या निवडणुकीत शिवसेनला मदत केली होती.

प्रभाकर पालोदकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप सर्वजण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. एरव्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी पाण्यात पाहणारे भाजप यावेळी सत्तारांना विरोध करण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!