Share

‘विश्र्वासघात करुन सत्तेत आलेल्या सरकारने कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा केली’

Published On: 

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती.

मात्र दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘विश्र्वासघात करुन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा केली,’ असा आरोप पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘सप्टेंबर- अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने 94 लाख हेक्टर क्षेत्राचा नुकसान केलं. उभ पिक डोळ्यासमोर गेलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार प्रती हेक्टर तर फळबागांना 50 हजार प्रती हेक्टर नुकसानभरपाई मिळावी असे म्हणाले होते. आता ते सत्तेत आहे, मात्र अजूनही एक रुपयाची मदत मिळाली नाही. त्यामुळे यावरून लक्ष बाजूला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फसवी कर्जमाफीची घोषणा केली,’ असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, ठाकरे सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पाळले नाही. तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीच सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले असून, त्यांचे प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे पाटील म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!