Share

भाजपने सोलापूर मतदारसंघात प्रकट केला नवा ‘देव’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजप पक्षाने सोलापूर मतदारसंघात नवीन देव प्रकट केला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्टांच्या काळात लोकांनी देव दर्शनाला न जाता या देवाचे दर्शन घ्यावे असा आवाहन सोलापूरच्या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराने केले आहे.

भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांची भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमध्ये भर पडली आहे. त्यांनी एक मजेशीर विधान केले आहे. ते म्हणाले, सुट्टीच्या काळात देवदर्शनाला जाऊ नका. देव तुमच्याशी बोलणार नाही, मी तुमचा बोलणारा देव आहे, असे विधान सिद्धेश्वर स्वामी यांनी केले आहे.

जय सिद्धेश्वर म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवसात देवदर्शनाला जाऊ नका. देवाला गेलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. देव भेटणार नाही, भेटला तर तुमच्याशी बोलणार नाही, बोलला तर म्हणेल आल्या पावली पत जा. तुमचे पैसे खर्च होतील, परंतु समाधान मिळणार नाही. देवाला जा-देवीला जा, कुठेही जा, तुळजाभवानीला जा किंवा पंढरपूरला जा, तिथे देव भेटणार नाही, तो बोलणार नाही. पण बोलणारा देव मी आहे.

जय सिद्धेश्वर यांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना टीका करण्यासाठी हे आयतं कोलित हाती मिळालं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!