Share

कर्जत – जामखेड मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा फटका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवार बरोबरीचे असल्याने या विधानसभेला कर्जत जामखेडमध्ये हाय-व्होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे उतरणार आहेत. तर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपचे विद्यमान मंत्री राम शिंदे असणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी  मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र अशातच भाजपला मोठा धक्का बसणार आहे. कारण राम शिंदे यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत बंडाच्या तयारीत आहेत.

नामदेव राऊत यांचा कर्जत तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. मात्र  नामदेव राऊत हे बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्ववभूमीवर नामदेव राऊत यांनी  सोमवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. तसेच नामदेव राऊत यांनी कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राम  शिंदे अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान  रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने कर्जत जामखेडच्या राष्ट्रवादीच्या नेत्या मंजुषा गुंड याही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राम  शिंदेंप्रमाणे रोहित पवार ही  अडचणीत येणार  आहेत. त्यामुळे कर्जत जामखेडची लढाई ही अत्यंत रंगतदार होणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!