अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील भाजप कार्यकर्त्यांचा एक डांस सध्या चांगलाच चर्चेत आहे. बार्शीटाकळीच्या भाजप कार्यालयात हे कार्यकर्ते ‘मुंगळा’ गाण्यावर झिंगाट डांस करतांना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’साठी बार्शीटाकळी येथे भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर या कार्यकर्त्यांनी आपले रंग उधळलेत.
या कार्यकर्त्यांमध्ये बार्शीटाकळीचे भाजपचे तालूकाध्यक्ष अविनाश महल्ले, विस्तारक गौवर्धन काकड, सरचिटणीस गणेश झळके, सरचिटणीस सुनिल थोरात, युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष गजानन लुले आणि मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरिश पिंपळे यांचे स्विय सहायक निलेश हांडे यांचा समावेश आहे. या सर्वांनी बैठकीनंतर झालेल्या पार्टीत हा डांस केल्याचं बोललं जातं आहे. त्यामूळे ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं हे नवं रूप या माध्यमातून समोर आलंय, असंच म्हणता येईल.
विशेष म्हणजे नुकतेच अकोल्यात सहा शेतकर्यांनी अन्याय झाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या या नाचावर सर्वच स्थरातून संताप व्यक्त केला जातोय.
पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
एनईएफटीची सुविधा आता चोवीस तास चालू ठेवण्याचा रिजर्व्ह बँकेचा निर्णय
जनतेपेक्षा तुम्हाला प्रचार महत्वाचा; अजितदादांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

