मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या 31 बंगल्यांचं नुतनीकरण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने एक निविदा काढली आहे. 15 कोटीचं खर्च त्यासाठी दाखविण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च होणारअसल्याची माहिती आहे.
राज्यात नवं सरकार आलं की मंत्र्यांच्या घरांचा प्रश्नही गाजत असतो. जुने नेते लवकर घर सोडत नाहीत आणि नव्या मंत्र्यांना राहायला घर मिळत नाही याची चर्चा कायम केली जाते. महाविकास आघाडीच्या सरकारला आता तीन महिने होत आलेत. मात्र मंत्र्यांच्या घरांवरून गेले काही दिवस चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मंत्र्यांच्या घर वाटपावरून मानापमान नाट्य घडलं होतं. सुरुवातीला वाटलेली घरं नंतर ज्येष्ठतेनुसार बदलण्यात आली होती. आता या घरांच्या नुतनीकरणावर होत असलेल्या उधळपट्टीवरून टीका होत आहे.
31 बंगल्यांवर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी होणार असल्याचा दावा आहे. म्हणजेच साधरणत: एका बंगल्यावर 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च होणार आहे. यापैकी सर्वात जास्त खर्च हा बाळासाहेब थोरातांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक या बंगल्यावर होतो आहे, अशी माहिती आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख तर, रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याचाही समावेश आहे. फडणवीसांच्या सारंग बंगल्यावर तब्बल 92 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे, अशी माहिती समोर येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
