मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझनला सुरवात झाली असून या सीजनमध्ये 15 कलाकार आहेत. या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा चर्चेतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. बिग बॉस सुरु होऊन आता १५ दिवस पूर्ण झाले असून, आता शोची रंगत वाढताना दिसत आहे.
दरम्यान, या शो मधील स्पर्धक आणि अभिनेत्री गायत्री दातार ही आता एका वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चेत आली आहे. घरातीतल इतर सदस्यांसोबत बोलत असताना गायत्रीनं यावेळी मराठी प्रेक्षकांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळं तिच्यावर आता सोशल मीडियावर जोरदार टीका टीका होत आहे.
https://www.instagram.com/p/CUg126-qjaF/?utm_source=ig_web_copy_link
गायत्री आणि जय यांच्यामध्ये प्रेक्षकांबद्दल बोलणं चालू असत जय हा हिंदी रिअॅलिटी शो मध्येही सहभागी झाला होता. यावेळी जय म्हणतो हिंदी आणि मराठी शोमध्ये फक्त भाषेचा फरक असतो. याच विषयावर गायत्री म्हणाली, ‘मराठी सिनेसृष्टीत कसं असतं ना, कलाकार जागृत असतात की, प्रेक्षकांना काय हवं आहे, त्यांना काय चालतं आणि काय आवडत नाही.
https://www.instagram.com/reel/CUeiwYdAqVK/?utm_source=ig_web_copy_link
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धकांना तर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मराठी प्रेक्षक लगेच कलाकारांना जज करतात. त्यातल्या त्यात मराठी कार्यक्रम पाहाताना खूप जज करतात. हिंदी शो पाहाताना इतकं जज करत नाहीत. मराठी अभिनेत्रीनं स्टायलिश कपडे घातले आणि तसेच कपडे हिंदी अभिनेत्रीनं घातले तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. माझ्या फोटोंवर अशा आक्षेपार्ह कमेंट्स आल्या तर मी त्या डिलिट करते’, असं गायत्री म्हणताना दिसते आहे. यावरून गायत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सुरक्षित वातावरणात शिक्षण देणं ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची सामुहिक जबाबदारी’
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

