Share

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे मोठे वक्तव्य

Published On: 

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa Cricket Team) वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने (Lungi Ngidi) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्धची मालिका त्यांच्या संघासाठी एक टोन सेट करू शकते आणि त्यांना योग्य दिशेने नेऊ शकते, असे लुंगी एन्गिडीने म्हटले आहे.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने डीन एल्गरच्या नेतृत्वाखाली युवा आणि अननुभवी संघ जाहीर केला आहे. 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील ही दक्षिण आफ्रिकेची पहिली कसोटी मालिका असेल.

एका वृत्त संस्थेशी बोलताना तो म्हणाला, ‘या प्रकारचा दौरा आम्हाला निश्चितपणे योग्य दिशेने जाण्यास मदत करू शकतो. आम्ही ज्या प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत, त्यामुळे ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप एक वेगळ्या प्रकारचे आव्हान असेल. आमच्या संघात खूप स्पर्धा आहे आणि त्यामुळे खेळाडूंना आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.’

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या २१ खेळाडूंची घोषणा केली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर बॉक्सिंग डे कसोटीने होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!