जयपूर : राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठीचा अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांनी बुधवारी स्वीकारला. विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टला घेण्यास राज्यपालांनी संमती दिली आहे.
सचिन पायलट यांच्या बंडाने राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकार अडचणीत आहे. पायलट यांच्या पाठिशी काँग्रेसचे १८ बंडखोर आमदार आहेत. दोनशे सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत गेहलोत यांनी काँग्रेसच्या पाठिशी १०७ आमदार असल्याचा दावा केला आहे. तर प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडे ७२ सदस्य आहेत.
भाजपकडून आणखी आमदार फोडाफोडीचा प्रयत्न होऊ नये म्हणून राजस्थानातील कॉंग्रेस आमदारांना जैसलमेर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आमदार आत्तापर्यंत जयपुर- दिल्ली रस्त्यावरील एका हॉटेलात मुक्कामाला होते.13 जुलैपासून हे आमदार त्या हॉटेलात राहात होते. आज त्यांना जैसलमेरला हलवण्यापुर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांची एक बैठक घेतली.
पक्षात एकजूट राखण्याच आवाहन त्यांनी केले. त्याच वेळी सचिन पायलट यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, ज्यांनी भाजपकडून पैसे घेतले नाहीत त्या आमदारांना पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतण्याचा मार्ग खुला आहे. त्यांनी पक्षात परत यावे त्यांचे येथे स्वागतच केले जाईल.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
हे सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये, जास्त दिवस टिकणार नाही – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

