Share

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

Published On: 

मुंबई : आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असं परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॉकडाउन आणि अनलॉकवर टीका केली. ते म्हणाले ‘“२३ मार्चपासून देशात लॉकडाउन आहे. सुरूवातीच्या काळात कोणाला कोरोनाच्या संकटाचा अंदाज नव्हता. आज जेव्हा आपण आकडेवारी पाहतो तेव्हा परिस्थितीत समजते. परंतु आपल्याकडे लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,”

राज ठाकरे यांनी पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील कर्मचारी यांचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘“आपल्याकडे पोलीस, डॉक्टर्स, अत्याव्यश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी खुपच चांगलं काम केलं. आजची कोरोना बाधितांची संख्या प्रश्नचिन्ह निर्माण करत. १३० कोटींच्या देशांच्या आतापर्यंत १३ लाख रुग्ण झाले असं म्हणतो. काही लोकांचा यात मृत्यू झाला हे दुर्देव म्हणायचं. आपण लॉकडाउन वगैरे किती काळ चालवणार आहोत. आज लोकांकडे आपलं काम आहे की नाही ही शंका आहे. पुण्यात तर दुकानं विक्रीला ठेवलेल्याचं फोटोही मी पाहिले आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, “काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, ‘मंत्र्यालयाच्या त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. सरकारनं नियमांप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितली आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत कामावर आहेत. तर त्यांनी मग सामान घ्यायला कधी जावं. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!