नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकटाशी दोन हात करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत.
गेल्यावर्षी जगभरात कोरोनाची साथ आली तेव्हा अमेरिकेने लसनिर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांशी करार करुन लसींचा मोठा साठा आपल्याकडे राहील, याची तजवीज केली होती. त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत बऱ्यापैकी लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अमेरिका कोरोना लसींचा अतिरिक्त साठा इतर देशांना देण्याचा विचार करत आहे. यामध्ये अमेरिका भारताचा प्राधान्याने विचार करत असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन’
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग


