Share

मोठी बातमी : राज्यातील जि.प , पंचायत समित्यांच्या निवडणूक ४ महिने पुढे ढकलल्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी पुढील काही महिन्यात होणाऱ्या निवडणुका चार महिन्यांच्या कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यामध्ये ३४ जिल्हा परिषदा असून त्याअंतर्गत ३५१ पंचायत समित्या आहेत. अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा कालावधी अडीच वर्षांचा असतो.

राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या महिन्यातील निर्णयानुसार नागपूर, वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांचे बहुतांशी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विशेष समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ ऑगस्ट व सप्टेंबर२०१९ मध्ये संपत आहे.

या निवडणुका पुढे ढकलायच्या असतील तर कालावधी वाढवावा लागणार असून त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यादेश काढून विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडण्यास आज मान्यता देण्यात आली.

आज पंतप्रधान देशाला संबोधित करणार, कलम ३७० काय बोलणार याकडे जगाचे लक्ष

रामदास आठवलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!