Share

मोठी बातमी! औरंगाबाद शहरात शनिवार, रविवार लॉकडाऊन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन असेल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल.

कसे असेल लॉकडाऊन?

या लॉकडाऊनसाठी लवकरच नवी नियमावली जारी केली जाणार आहे. यानुसार राजकीय सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करता येणार नाही.

रात्री ९ पर्यंत हॉटेल सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. पण रात्री ११ पर्यंत होम डिलिव्हरी सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयही अर्ध्या क्षमतेने सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र यानंतर जर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर मात्र औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!