ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष व आक्रमक नेते म्हणून ओळख असलेल्या अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना ठाण्यात खंडणीविरोधी विभागाने ताब्यात देखील घेतल्याचे समजते. जाधव यांना पूढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबईत ‘थायरोकेयर लॅब’विरोधात आंदोलन केलं होतं. या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ही लॅब बंद पाडली होती.
आता, एकूण पाच जिल्ह्यांतून त्यांना तडीपार होण्याचे आदेश दिले आहेत.तर, वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांना हि नोटीस देण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.
सीमेवर पुन्हा तणाव! चीनच्या हालचाली वाढल्या
दरम्यान, या अचानक बजावलेल्या नोटीशी नंतर त्यांना लगेच अटक देखील करण्यात आली. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत, आपली बाजू देखील मांडली. तसेच, या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी सिनेसृष्टीतील सद्य परिस्थितीवर बोलताना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले…
“मी गेली अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतंही आंदोलन मी स्वत:साठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोव्हिड सेंटरसाठी होतं. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून मला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे” असे अविनाश जाधव यांनी फेसबुकवर लाईव्ह येत सांगितले.
लपवाछपवी सुरूच : भाजपकडून फोडाफोडीची भीती, कॉंग्रेसने आपले आमदार जैसलमेरला हलवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

