लडाख: भारत आणि चीन दरम्यान गेले काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. LAC म्हणजेच प्रत्येक नियंत्रण रेषेवरून लडाख मधील भागात चीन वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या घुसखोरीचा भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देऊन या भागात भारताचे अस्तित्व अबाधित राखत आहेत. चीनने नियंत्रण रेषेच्या भागात हालचाली पुन्हा वाढवल्या आहेत. त्यामुळे तणाव हा आणखी वाढत असून, दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ होत आहेत.
आता, वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या आणखी हालचाली उघडकीस आल्या आहेत. डिसएंगेजमेंटनंतरही चीन पँगोंग लेकमध्ये आपल्या सैनिकांची तैनात वाढवत आहे. १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर चीनने पँगोंगमध्ये अतिरिक्त बोटी आणि सैन्य तैनात केले आहे. या वादग्रस्त भागात चीन आपली ताकद वाढवत आहे. पँगोंग लेकमध्ये चीनने नवीन कॅम्प बांधण्यास सुरुवात केली आहे. या कॅम्पमध्ये अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पँगोग लेकमध्ये आणखी बोटी उतरविल्या जात आहेत. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे.
‘शुभ बोल नाऱ्या’; शिवसेनेच्या या बढया नेत्याची राज ठाकरेंवर टीका!
चीनच्या या हालचाली सॅटेलाइटमध्ये कैद झाल्या आहेत. पँगोंग लेकमध्ये चीन आपली शक्ती वाढवत असल्याचे सॅटेलाइट फोटोतून दिसून येत आहे. २९ जुलैच्या सॅटेलाइट फोटोमध्ये बारकाईने पाहिले असता असे दिसून येते की, चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदल फिंगर -५ आणि फिंगर -६ मध्ये तळ ठोकून आहे. फिंगर -५ वर पीएलएच्या तीन बोटी आणि फिंगर-६ मध्ये १० बोटी आहेत. प्रत्येक बोटीत १० जवान आहेत. म्हणजेच १३० जवान फिंगर -४ च्या अगदी जवळ तैनात आहेत.
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील १२ महाविदयालयांना राष्ट्रवादीने केली मोठी मदत
पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळील फिंगर ४ वरुन मागे हटण्यास चीनने नकार दिला आहे. त्यामुळे चीनच्या या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. चीनने फिंगर फोरमधुनही मागे हटावे ही भारताची मागणी आहे. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशी जैसे थे परिस्थिती पूर्ववत करा, असे भारताचे म्हणणे आहे. आता फिंगर एरिया कळीचा मुद्दा बनला आहे. आधी भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. पण चिनी सैन्याने फिंगर फोर पर्यंत घुसखोरी केली आहे. चीनने पूर्वीप्रमाणे फिंगर आठ पर्यंत मागे फिरावे ही भारताची मागणी आहे. जर चीनने माघार घेतली नाही तर मात्र पुन्हा दोन्ही देशातील संघर्ष वाढून परिस्थिती चिघळू शकते.
…म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणीकृतच कीटकनाशके, खते, पिक वाढ संजीवके वापरावीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

