Share

महेंद्र सिंह धोनीच्या फॅन्ससाठी मोठी बातमी; धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या या लाटीत चित्रपट तसेच क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. याच स्पर्धेतील चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या आई वडीलाची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यांना उपचारासाठी रांची येथील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या आई वडीलांची प्रकृती स्थिर आहे. तसेच दोघांची ऑक्सिजन पातळीही सामान्य आहे. कोरोनाचे संक्रमण जास्त वाढले नाही त्यामुळे ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

महेंद्रसिंह धोनी हा सध्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला हंगामातील बारावा सामना त्याने जिंकला होता. हा त्याचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील २०० वा सामना होता. धोनीबरोबर त्याची साक्षी आणि मुलगी झिवा हेदेखील मुंबईत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!